Subscribe Us

इ 3,गणित,विस्तारित रूप,स्थानिक किंमत पान न 16 ते 18 मराठी माध्यम

 


video  पाहण्यासाठी  play  बटनावर क्लिक करा.


इ 3,गणित,विस्तारित रूप,स्थानिक किंमत  पान न 16 ते 18 मराठी माध्यम


संख्येचे विस्तारित रूप

ताई : ८२४ मध्ये किती शतक, किती दशक आहेत व किती एकक आहेत ? 

सोनू : ८२४ म्हणजे ८ शतक २ दशक व ४ एकक. 

टोनी : म्हणजे ८२४ = ८०० + २० + ४. 

नंदू : पण याच पद्धतीने २०३ कसे लिहायचे ? 

सलमा : २०३ = २०० + ३ 

ताई : ते बरोबर आहे, पण २०३ = २०० + 0 + ३ हे विस्तारित रूप जास्त सोईचे आहे,

कारण इथे शतकस्थानचा, दशकस्थानचा अंक व एककस्थानचा अंक कोणता हे चटकन समजते. याचप्रमाणे ८० चे ८० + 0 असे विस्तारित रूप होईल,

'९' ही एक अंकी संख्या घेतली, तर तिचे विस्तारित रूप '९' हेच आहे. 

खालील संख्याची विस्तारित रूपे लिहा.

 ९९८ , ३४ ,२८७, ५३४ , ७६ , ३०१ ,९०,४५ ,१३ 

ताई : विस्तारित रूप दिलं असलं, तर त्यावरून संख्या लिहिता येईल का ?

५०० + ३० + ७ हे विस्तारित रूप पाहा. 

सलमा : मी प्रयत्न करते.

५०० + ३० + ७ = ५३७ 

ताई : शाबास ! +विस्तारित रूपावरून संख्या लिहा.  

७०० + 0 + ५ 

 ४०० + ६० + ७

८०० + 0+0

३० +९ 

२०० + १० + १

१०० + ५० + 0 

 ४० + ४

 ३०० + 0 + ६ 

स्थानिक किंमत 

ताई : ४०० + ४० + ७ हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे ? 

नंदू : सोपे आहे, ४४७. 

सलमा : गंमतच आहे. एकदा ४०० साठी ४ हा अंक वापरला, तर नंतर ४० साठी ४ हा अंक

वापरला. 

ताई : अंकाची जागा किंवा स्थान तिची किंमत ठरवते, हे लक्षात घ्या, शतकस्थानच्या ४ ची

किंमत ४०० आहे, तर दशकस्थानच्या ४ ची किंमत ४० आहे. एककस्थानच्या ७ ची किंमत मात्र ७ च आहे. अंकाची त्यांच्या स्थानानुसार जी किंमत असते तिला त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणतात.



Post a Comment

0 Comments