B ED YCMOU ADMISSION 2023-25
माहितीपत्रकासाठी येथे क्लिक करा
भाग- I - बी.एड. प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
महत्त्वपूर्ण सूचना १) उमेदवाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरावा. त्याखाली असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री उमेदवाराने करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्जात भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच 'Submit' बटण दाबावे.
२) प्रवेशअर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) उमेदवाराला देण्यात येईल. या मुदतीतच उमेदवाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती करावी.
३) २०२३-२५ बी.एड. तुकडीचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी सेवा अनुभव दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत नोंदविता येईल. या तारखेनंतरचा सेवा अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाहीत.
४) ऑनलाईन प्रवेशअर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे असणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. ५) बी एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु.५००/- आहे. प्रवेश अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.
६) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित वर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित विद्यार्थ्यानी विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने प्रवेशार्थीच्या प्रवेशअर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून उमेदवाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा.
संपूर्ण माहितीपत्रक download करण्यासाठी खालील इमेज च्या उजव्या कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा
0 Comments
thanks