Subscribe Us

विचारधन

 

विचारधन

"संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस जीवनात सहजा सहजी हार मानत नाही. खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात. पण चांगले मित्र नक्की असतात. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल आपली मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणा साठी कितीही उलाढाल केली तर काहीही फरक पडत नाही." जे कोसळूनही पुन्हा उभे राहतात तेच जगायला लायक ठरतात. माझं कसं होईल? हा प्रश्न मला कधी पडत नाही. कारण सुर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. माणसाने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कि गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुध्दीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो.

      जीवन इतक्या इमानदारीने प्रतिष्ठेने आणि परिश्रमाने जगा की आपल्या मुलांना शिकवण देण्यासाठी दुसऱ्याचे उदाहरण देण्याची गरज पडू नये.ज्ञानाचा योग्य वापर केला तर सुख प्राप्ती होते.संस्कारामुळे जीवनात शांती मिळते आणि माणूसकीने वागलात तर समाधान मिळते. पैसा राहणीमान बदलू शकतो, पण व्यक्तिमत्व नाही. वास्तवात आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करण्याची तयारी असावी लागते. क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही पण अंगात दमच लागतो.

    सुंदर आयुष्य सहज घडत नसतं,तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं. मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड  वाटतं. नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ही टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात, शब्द नाही विसरत. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की, मतभेद सुद्धा हसत स्विकारता आले पाहिजेत. प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले, तरी मनात मात्र काय आहे? हे आपण कधीच ओळखू शकत नाही. आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल. हरलात तर मार्गदर्शन कराल.

सुंदर विचारधन


Post a Comment

0 Comments